निर्मल ग्रुप ग्रामपंचायत गिम्हवणे- वणंद, तालुका दापोली , जिल्हा रत्नागिरी
आपले सहर्ष स्वागत करते. ग्रामपंचायत स्थापना वर्ष - १९७५.
ही ग्रामपंचायत परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम आहे. येथील ग्रामस्थ एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.
गिम्हवणे ग्रामपंचायत ही गिम्हवणे व वणंद या दोन गावांचा समावेश असलेली समूह ग्रामपंचायत आहे. दापोली शहराच्या अगदी हद्दीला लगत असल्यामुळे या परिसराचा विकास वेगाने होत आहे.
वणंद हे गाव माता रमाई यांचे जन्मगाव म्हणून ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
गिम्हवणे हे शैक्षणिक, सामाजिक व व्यापारी दृष्ट्या प्रगत होत असून दोन्ही गावांची लोकसंख्या, संसाधनं व परंपरा एकत्र येऊन ही ग्रामपंचायत अधिक सशक्त होत आहे.
निसर्गरम्य परिसर, शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरा, तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमुळे माळवाडी गावाने तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूरमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
गावाच्या प्रगतीत लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि सामाजिक ऐक्य या मूल्यांना विशेष स्थान आहे.